श्री स्वामी समर्थ मानस पूजा | Swami Samarth Manas Puja | स्वामी समर्थ पुण्यतिथि 2026 विशेष

श्री स्वामी समर्थ मानस पूजा एक दिव्य मानसिक पूजा विधि है, जिसमें भक्त अपने मन में स्वामी समर्थ की पूजा करते हैं। यह पूजा विशेष रूप से स्वामी समर्थ पुण्यतिथि के दिन करने से अत्यंत शुभ फल देती है और जीवन में शांति, सुख तथा गुरु कृपा प्राप्त होती है।

श्री स्वामी समर्थ मानस पूजा

 

नमो स्वामी राजम दत्तावतारम
श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम
ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय
स्वामी समर्थाय नमो नमस्ते

हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळ
मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा
कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा
समर्था तुम्हा विण हो जीव तैसा

स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी
हृदयासनी या बसा प्रार्थितो मी
पूजेचे यथासांग साहित्य केले
मखरांत स्वामी गुरू बैसविले

महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती
जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ
परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त

सुवर्ण ताटी महारत्न ज्योती
ओवाळोनी अक्षता लावू मोती
शुभारंभ ऐसा करूनी पूजेला
चरणा वरी ठेवूया मस्तकाला

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा
तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा
प्रणिपात साष्टांग शरणागताचा
तुम्ही वाहिला भार या जीवनाचा

ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा
शिव शंकराची असें शक्तिपूजा
दहीदुध शुद्धोदकाने तयाला
पंचामृती स्नान घालू प्रभूला

वीणा तुतार्‍या किती वाजताती
शंखादि वाद्ये पहा गर्जताती
म्हणती नगारे गुरूदेव दत्त
श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली
श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली
महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया
महिमा तयांचा कळेना जगा या

मीं धन्य झालो हे तीर्थ घेता
घडू दे पूजा ही यथासांग आता
अजानबाहू भव्य कांती सतेज
नसे मानवी देह हा स्वामीराज

प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज
तया घालुया रेशिमी वस्त्र साज
सुगंधित भाळी टीळा रेखियेला
शिरी हा जरीटोप शोभे तयाला

वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा
सुवास तो वाढवी भाव साचा
शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते
गुलाब जाई जुई अत्तराते

गंधाक्षता वाहूनीया पदाला
ही अर्पूया जीवन पुष्प माला
चरणी करांनी मिठी मारू देई
म्हणे लेकरासी सांभाळ आई

इथें लावुया केशर कस्तुरीचा
सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा
पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली
गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली

करूणावतारी अवधूत कीर्ति
दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती
प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची
अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची

हृदमंदिरीची ही स्नेह ज्योती
मला दाखवी स्वामिची योगमुर्ति
करू आरती आर्त भावे प्रभूची
गुरूदेव श्री स्वामी दत्तात्रयाची

पंचारती ही असे पंचप्राण
ओवाळूनी ठेवू चरणा वरून
निघेना पुढें शब्द बोलू मी तोही
मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं

हे स्वामीराजा बसा भोजनाला
हा पंचपक्वान्न नैवेद्य केला
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची
लाडू करंजी असें ही खव्याची

डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा
हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा
पुढें हात केला या लेकरानें
प्रसाद द्यावा आपुल्या करानें

तांबुल घ्यावा स्वामी समर्था
चरणाची सेवा करू द्यावी आता
प्रसन्नतेतून मागू मी काय
हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय

सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू
दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ
नको दूर लोटू आपुल्या मुलासी
कृपा छत्र तुमचेच या बालकासी

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला
पदी ठेवू दे शीर शरणा गताला
हृदयी भाव यावें असे तळमळीचे
करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे

तुझें बाळ पाही तुझी वाट देवा
नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा
मनी पूजनाची असे दिव्य ठेव
वसो माझीया अन्तरी स्वामी देव

वसो माझीया अन्तरी स्वामी देव
वसो माझीया अन्तरी स्वामी देव

|| श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||

लाभ (Benefits)

  • 🙏 गुरु कृपा और आशीर्वाद प्राप्त होता है
  • 🧘 मानसिक शांति और ध्यान में वृद्धि
  • 🌟 मनोकामनाओं की पूर्ति
  • 🛡️ नकारात्मक ऊर्जा और बाधाओं से रक्षा
  • 💫 आत्मिक उन्नति और सकारात्मक ऊर्जा
  • 📿 पुण्यतिथि पर विशेष पुण्य फल

FAQ

स्वामी समर्थ मानस पूजा क्या है?

यह एक मानसिक पूजा है जिसमें भक्त अपने मन में स्वामी समर्थ की पूजा करते हैं।

❓ इसे कब करना चाहिए?

इसे प्रतिदिन किया जा सकता है, लेकिन स्वामी समर्थ पुण्यतिथि पर इसका विशेष महत्व है।

❓ क्या मानस पूजा प्रभावशाली होती है?

हाँ, सच्ची श्रद्धा से की गई मानस पूजा उतनी ही प्रभावशाली होती है जितनी वास्तविक पूजा।

❓ इसके क्या लाभ हैं?

यह मानसिक शांति, गुरु कृपा और मनोकामना पूर्ति प्रदान करती है।

❓ क्या कोई भी यह पूजा कर सकता है?

हाँ, कोई भी श्रद्धा और भक्ति से इसे कर सकता है।