Shri Ram Path | Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Jayanti | श्रीराम पाठ
“श्रीराम पाठ ही एक अत्यंत सोपी व प्रभावी नामसाधना आहे, जी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. महाराजांचा उपदेश होता — ‘रामनाम हाच खरा गुरु आहे’. त्यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम पाठ केल्याने जीवनात श्रद्धा, शांती आणि सत्कर्माची प्रेरणा प्राप्त होते.”
॥ श्रीमहाराज विरचित श्रीराम पाठ ॥
मंगलाचरण
॥ श्री गणेशाय नमः ॥
॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीराम ॥
ध्यान श्लोक
श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ।
ध्यातो तुझी राजस योग मुद्रा ॥
नेत्री न येरे तुजवीण निद्रा ।
कै भेटसी बा मजला सुभद्रा ॥
🌼 सद्गुरु वंदना
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला ।
जयाने सदा वास नामात केला ॥
जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती ।
नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती ॥
॥ श्रीराम पाठ ॥
ॐ नमो जी सद्गुरूनाथा । तुझे चरणी ठेविला माथा | पूर्ण करी मनोरथा । विनंति माझी परिसावी ॥१॥
रामपाठाचा उच्चार । मम हृदयी करी उद्धार । हेचि मागणे वारंवार । तुजलागी दयाळा ॥२॥
व्यास वाल्मीकी नारदमुनि । शुकसनकादिक ज्याचे ध्यानी । तो श्रीराम चापपाणि । मम वाणी वदो का ॥३॥
अयोध्यावासी नगरजन । रामासी भजती अनुदिन । तो कौसल्यानंदन | मम हृदयी वसावा ॥४॥
सद्गुरू म्हणे ऊठ लवलाही । ज्ञानदीपाचे प्रकाशे पाही । वस्तू आपली शोधूनी घेई । मग पावशी निजसुखा ॥५॥ सद्गुरू राजवैद्य पूर्ण । रामनामाचे रसायन । स्वहस्ते मम मुखी पाजून | केले सावध स्वरूपी ॥६॥
नेत्री घातले बोधांजन । भवरोग काढिला मुळीहून । मूर्ती दाविली सगुण । ते रूप वर्णिले न जाय ॥७॥
श्रीमहाराज विरचित ॥ श्रीराम पाठ ॥
चतुर्भुज मेघश्याम सांवळा । कांसे पीतांबर पिवळा । गळा वैजयंतीमाळा | मुक्ताहार डोलती ॥८॥
अंगी चंदनाची उटी । केशर कस्तुरी लल्लाटी ।
अमूल्य रत्ने शोभती मुकुटी । कर्णी कुंडले तळपती ॥९॥
क्षुद्रघंटा वाजती कटी । दशांगुली मुद्रिकांची दाटी । बाहुभूषणे शोभती मनगटी । सुवर्णपादुका चरणकमली ॥१०॥
शंख चक्र चाप बाण । वरद हस्त उदार वदन । विशाळ भाळ आकर्ण नयन । ऐसा भगवान देखिला ॥११॥
गुप्त ठेविले निर्गुण प्रकट केले स्वरूप सगुण ।
श्रीराम अवतार घेऊन । धर्म स्थापिला स्वहस्ते ॥१२॥
अयोध्या पुण्यपावन नगरी । तेथे श्रीराम राज्य करी ।
तपोनिधि महाक्षत्री | सिंहासनीं विराजे ॥१३॥
शेषे धरिले छत्र । भरतशत्रुघ्न धरिती चामर । भक्त प्रार्थिती वारंवार । जयजयकारे गर्जती ॥१४॥
नळ नीळ जाम्बुवंत | अंगद सुग्रीव बिभीषण भक्त । निरिच्छ वायुसुत । सदा निमग्न रामरूपी ॥१५॥
वसिष्ठ विश्वामित्र ऋषि । दत्त दिगंबर तापसी । ब्रह्मचारी कित्येक संन्यासी । रामनामी लुब्धले ||१६||
रामनाम हृदयी धरून । ध्यानी बैसले योगीजन । यम इंद्र अग्नि वरुण । पंचवदन तप करी ॥१७॥
रामनामाची अपरिमित शक्ती । शेषाची वर्णितां खुंटली मति । वेदाची न चले गति । शास्त्रे लज्जित बैसली ||१८||
अनंत अवतारांचा महिमा तोही रामनामी तुळेना । ऐशिया रामाच्या सद्गुणा । मी मानव काय वर्णू ॥१९॥
रामी रंगले त्रिभुवन । जडमूढ काष्ठ पाषाण । घटमठात सर्वांत परिपूर्ण । त्याहून वेगळा राहिला ॥२०॥
पिंडब्रह्मांडाची रचना | तू निर्मिली रघुनंदना ।
जगव्यापका आत्मारामा | शोधिता ठायी न पडे कोठे ॥२१॥
तुझे स्वरूपाची व्हावी प्राप्ती । यालागी कित्येक तप करिती । कित्येक पंचाग्निधूम्रपान साधिती । तयासी अंत न लागे तुझा ॥ २२॥ तेथे मी अज्ञान मूढमति । करू नेणे तुझी भक्ती । परि संतमुखे ऐकिली कीर्ती । शरणागता उद्धरी तू ॥ २३॥
माझ्या भाग्यासी नाही मिती । तूं भेटलासी जगज्ज्योति । आता कळेल तैशा रीती । उद्धारगती करी माझी ॥२४॥
तुझे ब्रीदाचे महिमान | कित्येक उद्धरिले पापीजन । विरोधभक्तीने रावण । वैकुंठपदी पावविला ||२५||
सात्त्विक भक्त थोर थोर । तुलसीदास कमाल कबीर । रामदास वायुकुमर । त्यांचा किंकर मज करी ॥२६॥
मी न मागे धनसंपत्ती | मज न लागे वैकुंठप्राप्ती । परी तुझ्या भक्तांची संगती | मज घडो सर्वदा ॥२७॥ कोट्यानुकोटी जन्म घेईन । करीन तुझे पादसेवन । अवतारलीला मुखाने गाईन । ऐसे मज देई सर्वथा ॥२८॥
तुझ्या अवतारलीला बहुत । व्यास बोलिले संस्कृत । ते अज्ञानासी न होय प्राप्त । यास्तव प्राकृत वर्णिले ॥२९॥
सद्गुरूने निर्मिला हा ग्रंथ । रामपाठ केवळ अमृत । श्रवणद्वारे पाजूनी यथार्थ । तृप्त केले भक्तजन ||३०||
ज्यासी वैकुंठपदाची गोडी । त्याने रामपाठ भजावा आवडी । त्याचे संकटी घालूनी उडी । श्रीराम रक्षी निजांगे ॥३१॥
ज्ञानदेव करी हरिपाठ | ब्रह्मचैतन्य करी रामपाठ ।
भक्तजनी मानावे दोन्ही श्रेष्ठ । ग्रंथ वरिष्ठ प्रभूचा ॥३२॥
मज काही ज्ञान नसे किंचित् । हृदयी प्रकटला जानकीकांत । त्याचा त्याने लिहून ग्रंथ । भक्तासी अर्पिला प्रीतीने ||३३||
|| जानकीजीवनस्मरण जय जय राम ||
🌸 श्रीराम पाठ के लाभ (Labh / Benefits)
🪔 मन को शांति और स्थिरता प्राप्त होती है
🪔 नकारात्मक विचारों और भय का नाश
🪔 श्रीराम की कृपा से जीवन में संतुलन
🪔 भक्ति, वैराग्य और आत्मबल की वृद्धि
🪔 गृहस्थ जीवन में सुख-शांति
🪔 नाम-स्मरण से चित्त शुद्धि
❓ FAQ (Frequently Asked Questions)
❓ श्रीराम पाठ क्या है?
उत्तर: श्रीराम पाठ भगवान श्रीराम के पावन नाम का श्रद्धापूर्वक उच्चारण और स्मरण है, जिसे गोंदवलेकर महाराज ने विशेष महत्व दिया।
❓ श्रीराम पाठ कब करना श्रेष्ठ है?
उत्तर: ब्रह्ममुहूर्त, रामनवमी, गुरुवार, एकादशी या गोंदवलेकर महाराज जयंती पर करना विशेष फलदायी माना जाता है।
❓ क्या श्रीराम पाठ बिना विधि के किया जा सकता है?
उत्तर: हाँ, श्रीराम पाठ अत्यंत सरल है। शुद्ध मन और श्रद्धा ही इसकी मुख्य विधि है।
❓ श्रीराम पाठ से कौन-सा फल मिलता है?
उत्तर: मानसिक शांति, ईश्वर से जुड़ाव, और जीवन की बाधाओं में कमी।
